औरंगाबाद : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यात अद्याप शाळा सुरू झालेल्या नाही. आता कारोनाच्या निर्बंधात थोडी शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची भेट घेतली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजनासह मर्यादित विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन कोचिंग क्लासेस सुरू करावी ही मागणी यावेळी आमदार दानवे यांच्यासह शिष्टमंडळाने केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे. काही विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेल्याने ऑनलाईन शिक्षणाकडे दुर्लक्ष करतांना दिसत असल्याचेही दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी क्लासेस बंद असल्यामुळे त्रस्त आहेत. तसेच क्लासेवर आधारित सेवा पुरवणाऱ्यांची आर्थिक परीस्थिती दिवसेंदिवस हालाखीची बनत आहे. त्यामुळे खासगी क्लोचिंग क्लासेस खुली करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी या वेळी करण्यात आली. शिष्टमंडळामध्ये प्रा. रविंद्र बनसोडे, प्रा. दिपक देशमुख, डॉ. भास्कर शिंदे, प्रा. यशवंत चव्हाण, चंद्रकांत शेजूळ, योगेश देशमुख यांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
- इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शासकीय कॉलेजच्या फी मध्ये ‘इतक्या’ हजारांची सूट !
- औरंगाबाद-पुणे रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी वेळ पडल्यास जनआंदोलन उभारु, खा. जलील यांचा इशारा!
- योगींना बळ देण्यास आठवले सज्ज; जे पी नड्डा यांची भेट घेऊन दिला युतीचा प्रस्ताव
- भारतीय स्वातंत्र्याच्या १८५७ च्या उठावात ‘औरंगाबाद’चे मोलाचे योगदान : डॉ. रमजान शेख
- मनपाचा स्तुत्य पुढाकार! गरीब विद्यार्थीही घेऊ शकतील सीबीएसएसी, इंग्रजी माध्यमातून शिक्षण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

