Share

Explained | तर शिंदे गटाचे ४० आमदार निवडून येणे कठीण, अस्तित्वाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी जिंकला

Published On: 

दसरा मेळावा यावर्षी शिवसेना आणि शिंदे गटासाठी अस्तित्वाची लढाई होती. दोन्ही गटाने एकमेकांवर जोरदार टीका केली. दसरा मेळाव्यात गद्दार, बंडखोर अशा शब्दांचा उच्चार करण्यात आला. जूनमध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शन केले. शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांना सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल गद्दार संबोधले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीला जनादेश मिळाला होता. तरी, ठाकरेंनी  राष्ट्रवादी-काँग्रेस सोबत सरकार स्थापन करून विश्वासघात केला. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत. हा मेळावा शिवसेनेचा पारंपारीक मेळावा आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेचे दोन मेळावे झाले. शिवसेनेतील बंडखोर आमदांचे भवितव्य या मेळाव्यात सिद्ध झाले. कोणाचा मेळावा सरस, अशी चर्चा असताना लोकांनी उद्धव ठाकरेंना पसंती दिल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. उद्धव ठाकरे यांना जनतेचा सहानुभूतीपूर्वक पाठींबा मिळाला. हा पाठिंबा असाच राहीला तर शिंदे गटातील ४० आमदार पून्हा निवडून येणे शक्य नाही.

बंड झाला तेव्हापासून शिवसेनेच्या गोटात शांतता होती. निष्ठावंत शिवसैनिक नाराज होते. मात्र पक्षाला मोठे भगदाड पडले असताना देखील उद्धव ठाकरे यांनी सयंमाने परिस्थिती हाताळत जनता शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटात कालच्या सभेमुळे चांगलाच उत्साह वाढला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटात शांतता आहे. काल उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले. सोशल मीडियावर देखील उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यांवर भाषण वाचून दाखवले म्हणून टीका होत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी लोकांची मने जिंकली म्हणून कौतुक होत आहे. असेच चित्र जर राहिले तर शिंदे गटाचे ४० आमदार निवडून न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपचा डाव देखील फसण्याची शक्यता आहे.

शिवसेना सोडलेले पुन्हा निवडून आले नाहीत-

कालचा दसरा मेळावा राजकीय भवितव्यासाठी महत्वाचा होता. भाजप वरिष्ठांकडून दोन्ही मेळाव्याची दखल घेतली गेली आहे. त्यामुळे भाजप यापुढे काय रणनीती आखेल याकडे लक्ष लागले आहे. आतापर्यंत शिवसेना सोडलेले पुन्हा निवडून आले नाहीत. यामध्ये नारायण राणे, छगन भुजबळ अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे भाजपने घडवून आणलेला बंड (विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी कबूली दिली आहे) देखील अपयशी होऊ शकतो. सामान्य जनतेत देखील शिवसेनेबाबत प्रेम निर्माण होत आहे. याचा चांगलाच फटका शिंदे गट आणि भाजपला बसू शकतो. कालच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना समर्थन देणाऱ्या पोस्ट शेअर करत आहेत तर एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत. ही पाक्षीक भूमिका असली तरी सामन्य जनेतेमध्ये देखील उद्धव ठाकरेंप्रती सहानुभूती आहे.

पैशांनी उत्साह विकत घेता येत नाही-

जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी कालच्या मेळाव्यावर भूमिका स्पष्ट केली. वागळे म्हणाले, “एकनाथ शिंदेचं भाषण फडणवीसांनी लिहून दिलं होतं काय? मध्येमध्ये फडणवीसांप्रमाणे ओरडतही होते. ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या,वाण नाही पण गुण लागला!. न्यायालयाचा निकाल काहीही लागो, खरी शिवसेना कोणती हे काल स्पष्ट झालं. एकनाथ शिंदेनाही ते कळलं असेल. गुवाहाटीत सुरु झालेला खोक्यांचा खेळ काल बिकेसीवरही दिसला. आता महापालिका निवडणुकांपर्यंत या खेळाला ऊत येईल. मतदार त्याला बळी पडले नाहीत तर भाजपला शिंदे सेनेत स्वारस्य उरणार नाही. शिवसेनेचा मेळावा शिंदे सेनेपेक्षा अधिक प्रभावी आणि उत्स्फूर्त होता. एकनाथ शिंदेंचं लिहून आणलेलं भाषणही सुपरफ्लॅाप ठरलं. पैशांनी उत्साह विकत घेता येत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!”

शिंदे गटातील मंत्र्यांचे अस्तिव धोक्यात?-

कालच्या मेळाव्यानंतर शिंदे गटातील मंत्र्याचे देखील अस्तिव अंधारात आहे. शिंदे गटाने कितीही आरडाओरड केली तरी शिवसेना आणि ठाकरे हे समिकरण महाराष्ट्रात तयार झालेले आहे. शिवसेना म्हटलं ठाकरे कुटुंबाचा इतिहास समोर येतो. तसेच शिंदे गटाचे शिवसेना काबिज करण्याचे प्रयत्न लोक उघड्या डोळ्याने पाहत आहेत. त्यामुळे काल जयदेव ठाकरे यांनी देखील हे सर्व बरखास्त करा आणि निवडणूका घ्या, असे वक्तव्य शिंदे यांच्या व्यासपीठावर केले. शिंदे गटातील मंत्री शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आले आहेत. त्यामुळे पुढील निवडणूक त्यांच्यासाठी अटीतटीची असणार आहे.

मेळाव्यासाठी परराज्यातून लोक आणल्याचा आरोप?-

शिंदे गटावर दसरा मेळाव्यात गर्दी दिसण्यासाठी परराज्यातून लोक आणल्याचा आरोप होत आहे. सगळीकडे याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक माध्यमांनी असे वृत्त देखील दाखवले आहे. त्यामुळे शिंदे गटाची प्रतिमा मलिन होत आहे. परराज्यातून आणलेल्या लोकांना आपण मुंबईत कशासाठी चाललो हे देखील माहित नव्हते. बालेवाडी येथून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आलेल्या बसेसमधून पुण्यातील मराठी न समजणाऱ्या कामगारांनाही फिरायला जायचं आहे असं सांगून या मेळाव्यासाठी आणण्यात आलं आहे. हे सर्व कामगार पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारचे असल्याचं सांगतात, टीव्ही ९ ने याचा खुलासा केला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या सभेला असलेले लोक सहानुभूती आणि ठाकरे परीवारावरच्या प्रेमापोटी आले होते, असे काल माध्यमांनी घेतलेल्या मुलाखतीतून स्पष्ट झाले.

गर्दी म्हणजे पाठींबा नाही?

शिंदे गटातील नेते बीकेसीवर उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी असल्याचे सांगत आहेत. पण बीकेसीवर हजर असलेल्या लोकांमध्ये राज्यातील मतदार कीती होते?, असा प्रश्न निर्माण होत आहे. ४० आमदारे सोडून गेले तरी उद्धव ठाकरे यांनी खिंड लढली, मोठा मेळावा यशस्वी केला. ४० आमदार त्यांचे समर्थक, कार्यकर्ते गेले तरी शिवतिर्थावरील गर्दी कमी नव्हती. त्यामुळे गर्दी म्हणजे पाठींबा नाही. मतदार शेवटच्या क्षणी निर्णय बदलतात. मतदारांना विश्वास हवा असतो आणि तो उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत दिल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!