Share

कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…

Published On: 

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. सह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला. पराभवानंतर कोहलीने याचे कारणही सांगितले.

सामन्यानंतर कोहली म्हणाला, पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाची लय बिघडली होती. ‘पहिला दिवस पावसाने वाहून गेला आणि जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा लय शोधणे कठीण होते. आम्ही फक्त तीन विकेट गमावल्या, जर पाऊसाचा खेळात व्यत्यय नसता तर आम्ही आणखी धावा करू शकलो असतो.

दरम्यान, डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे. या स्पर्धेचा विजेता किमान तीन सामन्यांच्या निकालाने ठरला पाहिजे, असे विधान काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीही प्रशिक्षकांच्या मताशी सहमत आहे. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने होणे गरजेचे आहे, केवळ दोन दिवसांच्या खेळावर सर्वोत्तम कसोटी संघ ठरू शकत नाही, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर कोहलीने  असे मत व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!