Share

ईडीच्या रडारवर असलेले अनिल देशमुख अटकेच्या भीतीने ‘नॉट रिचेबल’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या ईडीच्या ‘हिट लिस्ट’ वर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीने देशमुखांची ४ कोटी २० लाखाची संपत्ती जप्त केली केली. त्यांच्यावर ईडीचा आरोप आहे की त्यांनी आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील बार मालकांकडून १०० कोटी रुपयाची खंडणी घेतली.

दरम्यान, मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना बार मालकांकडून पैसे वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपा नंतर या प्रकरणात न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सीबीआय चौकशी नंतर ईडीने आपले लक्ष या प्रकरणात घातले. त्या नंतर त्यांनी देशमुखांच्या मुंबई आणि नागपूर या दोन्ही निवास्थानांवर छापे मारले. तसेच त्यांच्या पीएला अटक करण्यात आली आणि काही दिवसांनी देशमुखांची ४ कोटी २० लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली.

मालमत्ता जप्तीनंतर ईडीने त्यांना चौकशीसाठी परत समन्स बजावला. त्यांनी त्याचेही उत्तर दिले नाही. तसेच त्यांचा कुठलाही संपर्क झाला नाही. त्यामुळे रविवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे मुळ गाव काटोल येथील निवासस्थानी व नागपूर परिसरातील काही ठिकाणांवर छापे टाकले. तरीही देशमुखांशी संपर्क होऊ शकला नाही.

त्यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावला त्यांनी तीनही वेळा वेगवेगळी करणे दिली. कधी कोरोनाचे कारण तर कधी प्रश्नावलीची मागणी करत त्यांनी चौकशी टाळली असे वृत्त आहे. देशमुखांचा असा आरोप आहे की त्यांच्यावर होणारे सर्व आरोप राजकीय सूडबुद्धीने होत आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!