नंदुरबार : तोरणमाळहून खडकी पॉईंट येथून सिंधी येथे जाताना बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी गाडीला अपघात झाला. या अपघातात पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार अपघातातील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. याबाबत संसदेच्या अधिवेशनापूर्वी त्यांनी मराठीत ट्विट करत ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील नंदुरबारमधून एक दुःखद बातमी आहे. अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल सहवेदना व जखमींसाठी प्रार्थना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधुन प्रत्येकी दोन लाख सानुग्रह मदत तर, जखमींना 50,000 रुपये दिले जाणारः पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 18, 2021
ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील नंदुरबारमधून एक दुःखद बातमी आहे. अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल सहवेदना व जखमींसाठी प्रार्थना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाख सानुग्रह मदत तर, जखमींना 50,000 रुपये दिले जाणार’, असल्याचे मोदींनी म्हटलं आहे.
कसा झाला अपघात?
सायंकाळच्या वेळी सिंधी ते खडकी दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ते दरीत जाऊन कोसळले. त्यात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात गुमानसिंग तुळशिराम (रा. शेमलेट,), वेरांग्या धनसिंग (रा. शेमलेट), कमल रेहमसिंग (रा. खेरवाणी), मुन्नालाल तडवी (रा. चेरवी), खागीराम ठुंडला (रा. चेरवी), भाकीराम सेवा (रा. शेमलेट, सर्व मध्य प्रदेश) यांच्यासह अन्य दोघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
चालक राकेश तुळशिराम याला ब्रेक फेल झाल्याचे कळताच त्याने उडी घेऊन स्वत:चा जीव वाचवला. मात्र, अन्य प्रवाशांना त्याच्यामुळे जीव गमवावा लागला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमींची नावे उशिरापर्यंत मिळू शकलेली नाही. खडकी व सिंधी परिसरातील आदिवासी बांधवांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना बाहेर काढून तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता तयार
तोरणमाळ–सिंदिदिगर रस्त्यावर अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. स्वातंत्र्यांनतंर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळ सोबत जोडला गेला आहे. मात्र असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी
- ‘दलित, ओबीसी, शेतकऱ्यांची मुले मंत्री बनले म्हणून काही लोकांना पोटशूळ’; विरोधकांच्या गोंधळावर मोदींच भाष्य
- ‘तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर कोरोना लस घ्या!’, पंतप्रधान मोदींचे आवाहन
- कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
- श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने नोदंवले अनेक ‘गब्बर’ विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

