Share

नंदुरबारमध्ये गाडी दरीत कोसळली; भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, १५ जखमी

Published On: 

नंदुरबार : जिल्ह्यातील तोरणमाळ–सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहूतक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला. तर पंधराहून अधिक प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आज सोमवार सकाळपर्यंत बचावकार्य सुरू होते. गाडी खोल दरीत कोसळल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नंदूरबार येथील तोरणमाळ-सिंदिदिगर या अतिदुर्गम भागात एका बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे. स्वातंत्र्यांनतंर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळ सोबत जोडला गेला आहे. मात्र असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे.

पोलीस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य सुरू असून जखमींना तोरणमाळ, म्हसावद याठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्रशासनाने अद्यापही कुठलीही माहिती दिलेली नाहीये. याठिकाणी संपर्क यंत्रणा नसल्यानेच माहिती मिळण्यात देखील अडसर निर्माण होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!