🕒 1 min read
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या सत्रादरम्यान सरकार अनेक विधेयके पारित करणार आहे. तर, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान जाणवलेला आरोग्य सुविधांचा अभाव आणि पेट्रोल तसंच डिझेलच्या वाढत्या किमती या मुद्द्यांवरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला घेरण्याच्या तयारीत आहेत.
अधिवेशापूर्वी संसदेबाहेरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावं, असे आवाहन नेत्यांना केले. तसेच भारतवासियांना कोरोना लस घेण्याचे आवाहनही केले.
Speaking at the start of the Monsoon Session of Parliament. https://t.co/QENuZOzQRh
— Narendra Modi (@narendramodi) July 19, 2021
ते म्हणाले, ‘मला विश्वास आहे की, तुम्ही सगळ्यांनी लसीचा किमान एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन करा. लस ही हातावर (बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आता पर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त नागरिक कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल’ असे मोदींनी म्हटले.
दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे संसदेत पोहोचण्यासाठी सर्वच नेत्यांना छत्रीचा आधार घ्यावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्व:त छत्री घेऊन संसदेत पोहचले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्णधार शिखरने मैदानात पाऊल ठेवताच केला ऐतिहासिक विक्रम ; धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
- श्रीलंकेविरुद्ध शिखर धवनने नोदंवले अनेक ‘गब्बर’ विक्रम
- ‘केवळ नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार?’ ; दरेकरांचा सवाल
- ‘मोदी सरकार कोसळण्यासाठी २०२४ पर्यंत थांबावं लागणार नाही’; बड्या नेत्याचे भाकीत
- पृथ्वी शॉचं कौतुक करत शास्त्रींची घेतली फिरकी ; सेहवागचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
