Share

‘दलित, ओबीसी, शेतकऱ्यांची मुले मंत्री बनले म्हणून काही लोकांना पोटशूळ’; विरोधकांच्या गोंधळावर मोदींच भाष्य

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : आज दि.१९ जुलै पासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट रोखण्यात आलेले अपयश, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, शेतकरीविरोधी कायदे या मुद्दय़ांवर विरोधक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. यामुळे मोदी सरकारसमोर हे अधिवेशन विना अडथळा पार पाडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार केला होता. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या नवनियुक्त मंत्र्यांची ओळख सभागृहाला पंतप्रधान नरेंद्र मोदी करून देत होते. मात्र, या सत्रात विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. नव्या मंत्र्यांची ओळख पटलावर मांडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच गोंधळात आपलं भाषण केलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेची गरिमा राखत विरोधकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तरीदेखील विरोधकांनी आपला आक्रमक बाणा कायम ठेवत गोंधळ केला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणातून विरोधकांना लक्ष्य केलं. ‘देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर दलित, महिला, ओबीसी, शेतकऱ्यांचे पुत्र मंत्री बनले ही गोष्ट काही लोकांना पचत नाहीये. त्यामुळेच हे लोक त्यांचा परिचय देखील होऊ देत नाहीयेत,’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

गोंधळ न करता प्रश्न विचारा आणि त्याची आम्हाला उत्तरे देखील देऊ द्या !

सभागृहाचं कामकाज परिणामकारक झालं पाहिजे. सार्थक चर्चा झाली पाहिजे. देशातील लोकांना जी उत्तरं हवी आहेत. सरकार त्याची उत्तरं द्यायला तयार आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी आणि राजकीय पक्षांनी कठोर प्रश्न विचारावेत, प्रत्येक प्रश्न विचारावा. पण शांत वातावरणात प्रश्न विचारावे. तसेच सरकारला उत्तरं देण्याची संधीही द्यावी. कारण जनतेची प्रश्न सुटले पाहिजे, असं आवाहन विरोधकांना मोदी यांनी कामकाज सुरु होण्याआधी माध्यमांशी बोलताना केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!