मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा खुलासा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. पण हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. असा आरोप राऊत यांनी केला आहे. यावरच आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या उत्तर न देताच कारची काच लावून निघून गेले. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे.
“इडीची पुण्याई पाठीशी असल्यामुळे ते बिनधास्त आहेत. पैसे योग्य ठिकाणी गुजरातला तर पाठवले नाहीत ना?”, असा सवाल अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत लगावला आहे. तर यावरच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही ट्वीट करत म्हटले की, “किरीटजी पैसे काय केले? उत्तर नाही. पत्रकार परिषदेतून पळून गेले. देशद्रोही, निर्लज्ज माणूस.”
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (६ एप्रिल) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर संजय राऊत यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा नवीन लढा सुरू झाला आहे आणि त्यासाठी आम्ही बलिदान देण्यास तयार आहोत असे म्हटले. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“२५ वर्ष मराठी माणसाच्या नावावर…”, निलेश राणेंचा शिवसेनेवर निशाणा
“किरीटजी पत्रकार परिषदेतून पळून गेले, देशद्रोही…”, संजय राऊतांचे टीकास्त्र
“मोदींनी देश उद्ध्वस्त…”, महागाईवरून नाना पटोलेंचे टीकास्त्र
“कोरोनाची लाट पुन्हा येऊ नये, यासाठी…”, अजित पवारांचे सूचक वक्तव्य
“तुम्ही काय Xपटलं, तुम्ही काय कापलं सांगा”?; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

