मुंबई : अमरावतीमधील एक तरूणी बेपत्ता झाली होती. मुलगी सापडत नसल्याने तिच्या पालकांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. यानंतर राजापेठ पोलीसांनी एका युवकास ताब्यात घेतले मात्र त्याच्याकडे या मुलीविषयी कुठलीच माहीती नव्हती, सदर युवक हा एका विशिष्ठ धर्माचा असल्याने अमरावतीमधील काही राजकीय नेत्यांनी या प्रकणाला लव्ह जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि याकरीता खासदार नवनीत राणा यांनीसुध्दा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. त्यामुळे अमरावतीसह राज्यभरातील पोलीस कर्मचारी,वकिलांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. अशातच यासगळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरी यांचे वक्तव्य-
खरं तर, नवनीत राणा यांनी पोलिसांचा अपमान केला आहे, हे वास्तव आहे. कारण पोलिसांमुळेच आपल्याला दिवाळी, दसरा यासारखे सण साजरे करता येतात. नवनीत राणा यांनी यापूर्वीही दहीहंडी उत्सवात माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर माझ्याशी गाठ आहे, अशी पोलिसांना धमकी दिली होती. ज्यांच्या भरवश्यावर आम्ही माणसं जिवंत आहोत, त्यांना नवनीत राणा धमक्या देत असल्याचं मिटकरी यांन म्हटलं आहे. अमोल मिटकरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि पंजाबराव देशमुखांनी अमरावतीला समरसतेची ओळख दिली.समरसता शिकवणाऱ्या शहरामध्ये जेव्हापासून नवनीत राणा खासदार झाल्या आणि रवी राणा आमदार झाले, तेव्हापासून हिंदू-मुस्लीम हा धृवीकरणाचा भाग झाला आहे. याच्या अगोदर विदर्भाची किंवा अमरावतीची अशी ओळख नव्हती, असं म्हणत मिटकरींनी राणांना चांगलंच डिवचलं आहे.
त्याचबरोबर पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी जे आरोप केले आहे ते खरे आहेत. तसेच राणा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे. हा पोलिसांचा अपमान आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी पोलिसांची माफी मागायला काही हरकत नसल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. पुढे ते असंही म्हणाले की, पोलीस आणि शेतकरी असे दोन व्यक्ती आहेत, की ज्यांच्यामुळे आपण सुखा-समाधाने जगू शकतो, असं मिटकरी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah | “राहुल बाबा परदेशी टी-शर्ट घालून…” ; अमित शहा यांचा हल्लाबोल
- Shivsena | शिवसेनेला पुन्हा धक्का! ‘हे’ आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Vinod Tawde | विनोद तावडे यांच्यावर नितीशकुमारांचे चक्रव्यूह आणि महागठबंधन फोडण्याची जबाबदारी
- Nitesh Rane | “जसे उद्धव ठाकरे तशाच किशोरी पेडणेकर”; नितेश राणेंचा हल्लाबोल
- Nitesh Rane | देवेंद्र फडणवीस हिंदुहृदयसम्राट! नितेश राणेंचे उद्गार, शिवसेनेवर सोडले टीकास्त्र


