Share

Ambadas Danve | दिल्लीतील पातशहांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री हैद्राबादमध्ये गेले ; अंबादास दानवेंची खोचक टीका

Published On: 

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमानंतर हैद्राबादला गेले. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दिल्लीमधील पातशहांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री हैद्राबादमध्ये गेले. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी ही टीका केली आहे. अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावर टीका केली.

हैद्राबाद मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत हैद्राबादला आहेत. यावर अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. दानवे म्हणाले, हैद्राबादला दिल्लीचे पातशहा आले आहेत. मराठवाड्यात पेक्षा, महाराष्ट्रापेक्षा यांना हैद्राबाद प्रिय आहे. याला चटावरचा श्राद्ध म्हणतात. अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम आटोपला. पण शिवसेनेने रीतसर हा कार्यक्रम केला आहे.

अमित शहांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवलं-

यापूर्वी अंबादास दानवे यांनी अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर टीका केली होती. अमित शहा गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम त्यांनी केले आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्ला केला होता.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून, सत्ताधारी नेत्यांवरही अंबादास दानवे यांनी हल्ला केला होता. बुलेट ट्रेनच्या कामासाठी येण्यापेक्षा नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या वावरात यावे, असं म्हणत शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी दानवे यांनी केली होती.

पुढे ते असंही म्हणाले होते की, मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला ते देण्याचे काम सुरू आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!