Share

Raj Thackeray | “मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा”; राज ठाकरेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आज 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आहे. सगळीकडे हा दिन साजरा केला जात आहे. याच दिनाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवर एक पत्र ट्विट करत केली आहे.

राज ठाकरे यांची मागणी ?

राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास शाळेतील पुस्तकार शिकवला जावा, अशी मागणी  त्यांनी केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्यात्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिबास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

आजचा दिवस हा महाराष्ट्र राज्यासाठी गौरवाचा दिवस आहे. कारण  हैद्राबादच्या निजमांचं स्वप्न होतं की, त्यांना त्यांचं वेगळं राष्ट्र निर्माण करायचं होतं आणि त्यांची तशी तयारी देखील होती. परंतू जर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं असतं तर देशाचं अखंडत्व धोक्यात आलं असतं. हे होऊ नये यासाठी मराठवाड्याने दिलेला लढा अभिमानास्पद आहे. परंतू या सगळ्याची माहिती अनेकांना आणि विशेषत: नव्या पिढीला माहित नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी ही मागणी केली असल्याचं समजतं आहे.

तसेच, आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या दिनानिमित्त औरंगाबादमध्ये कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असून, त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!