नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांचा आज 72वा वाढदिवस आहे. अनेकांना मोदींची संपत्ती किती? घर कुठे? हे जाणून घेण्याबाबत कुतूहल आहे. तर नुकतच पंतप्रधान कार्यालयाने याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे.
नरेंद्र मोदी यांची संपत्तीः
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2.23 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीचे मालक आहेत. पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी मिळालेल्या संपत्तीत वर्षभरात 26 लाख रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे गांधीनगर मधील त्यांच्या वाटेची जमीन मोदींनी दान केली आहे.
वाटेची जमीन दान केलीः
गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी ऑक्टोंबर मध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. रिअल इस्टेट सर्वे नंबर 401/ए वर त्यांच्याकडे मालकी हक्क नाही. कारण त्यांनी त्यांच्या वाटेची जमीन दान केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदींची एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत एकूण 26.13 लाख रुपयांची वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही बॉण्ड, स्टॉक अथवा म्युचल फंडमध्ये गुंतवणूक केलेली नाही. तसेच स्वतःच त्यांच्याकडे वाहनही नाही. मात्र त्यांच्याकडे 1.73 लाखांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.
महत्वाच्या बातम्याः
- Maharashtra Rains | राज्यात परतीच्या पावसाने घातला धुडघूस.. आजही ऑरेंज अलर्ट..
- Devendra Fadnavis | महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत गुजरातच्या पुढे जाईल – देवेंद्र फडणवीस
- Gulabrao Patil | “अजित पवार आम्हाला गद्दार म्हणाले ते आम्हाला मान्य, पण…”, गुलाबराव पाटील
- Health Tips | फास्ट फूडचे शौकीन आहात,तर सावधान! कारण फास्ट फूड करते तुमच्या आरोग्यावर परिणाम..जाणून घ्या!
- Manikrao Gaavit | मोठी बातमी! माजी मंत्री माणिराव गवित यांनी घेतला आखेरचा श्वास


