🕒 1 min read
मुंबई : मुंबईमध्ये आज देखील पाऊस कायम सुरू राहणार आहे. त्याचबरोबर पालघर आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात साधारणपणे ढगाळ वातावरण असेल. आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही ठिकाणी अधून मधून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याने वर्तवली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर आणि मध्य महाराष्ट्राच्या काही परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी (आज) देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकण,विदर्भ वगळता, मराठवाड्यात आठवडाभर तर मध्य महाराष्ट्रात १८ सप्टेंबरपासून पुढचे ५ दिवस म्हणजेच २३ सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर थोड्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता जाणवते. त्याचबरोबर मुंबई सह संपूर्ण कोकणातील ४ जिल्ह्यांमध्ये मात्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मान्सून परतीच्या पावसाचे वेध येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.या महिन्याखेरपर्यंत पावसाची तीव्रता टिकून राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]
महत्वाची बातम्या
- Devendra Fadnavis | महाराष्ट्र पुढील दोन वर्षांत गुजरातच्या पुढे जाईल – देवेंद्र फडणवीस
- Gulabrao Patil | “अजित पवार आम्हाला गद्दार म्हणाले ते आम्हाला मान्य, पण…”, गुलाबराव पाटील
- Health Tips | फास्ट फूडचे शौकीन आहात,तर सावधान! कारण फास्ट फूड करते तुमच्या आरोग्यावर परिणाम..जाणून घ्या!
- Manikrao Gaavit | मोठी बातमी! माजी मंत्री माणिराव गवित यांनी घेतला आखेरचा श्वास
- Ambadas Danve | “मुख्यमंत्री दिल्लीच्या पातशाहच्या आदेशावरून निर्णय घेतात”
- Eknath Shinde | मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – एकनाथ शिंदे
- Girish Mahajan | “ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
