Share

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमर, मुलगा अजिंक्यने ट्वीट करून दिली माहिती

Published On: 

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळी छाप सोडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ‘सीमा देव’ यांची प्रकृती अचानक खालावली आहे. सीमा यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

अजिंक्य देव यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. अजिंक्य देव यांनी त्यांच्या आईंना अल्झायमर आजारानं ग्रासलं असल्याचं सांगितलं आहे. सध्या त्या या दुर्गम आजाराशी झुंज देत आहेत.अजिंक्य देव यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझी आई श्रीमती. मराठी चित्रपटसृष्टीतील सीमा देव अल्झायमर या आजाराशी लढत आहेत. संपूर्ण देव कुटुंब ती लवकर बरी व्हावी यासाकरता प्रार्थना करत आहे. संपूर्ण महाराष्ट्राने तिच्यावर जे प्रेम केलं त्यांनीही तिच्याकरता प्रार्थना करावी.’

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणाऱ्या सीमा देव यांची लोकप्रियता आजही कायम आहे. सीमा देव आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावर जितकी प्रेक्षकांच्या आवडीची तितकंच खऱ्या आयुष्यातही त्यांनी खऱ्या अर्थानं सहजीवनाचा आदर्शच सर्वांपुढं ठेवल्याचं पाहायला मिळालं. एव्हरग्रीन सेलिब्रिटी जोडी म्हणूनही या दोन्ही कलाकारांकडं पाहिलं जातं.

शालेय शिक्षण सुरू असतानाच सीमा देव यांनी 1957मध्ये ‘आलिया भोगासी’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. विशेष म्हणजे या चित्रपटात त्यांनी रमेश देव यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. ‘पडछाया’मध्ये त्या रमेश देव यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. तर, बऱ्याच चित्रपटात रमेश देव त्यांचे सहकलाकार होते. त्यांच्या अभिनयाने गाजलेले ‘जगाच्या पाठीवर’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘मोलकरीण’, ‘पडछाया’, ‘अपराध’ हे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!