Share

मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ

Published On: 

मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, नुकतीच अवघी मुंबई वीजसंकटात सापडल्याच पाहायला मिळालं. मुंबईसह उपनगरामध्ये अचानक वीज पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे.

या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. सरकारवर आता सर्व स्थरातून टीका होत आहे. भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली होती. “राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक गेलेल्या वीजेविना हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा. ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.”अशी मागणी आशिष शेलार यांनी केली होती.

दरम्यान, आता हे प्रकन एक वेगळे वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण वीज पुरवठा खंडित होण्याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली आहे. “सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!