Share

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?

Published On: 

मुंबई- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड लवकरच होणार असल्याची चर्चा आहे.या निवडणुकीसाठी अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. खर तर  विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर जूनमध्येची निवड होणं अपेक्षित होतं. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवड लांबणीवर टाकण्यात आली. मात्र आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते राज्यपाल नियुक्त जागांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्रावरून राज्यभर उलटसुलट चर्चा सुरु झाली. राज्यपालांच्या विरोधात जनमत चालले असल्याचे दिसून येत असताना या वेळी राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला तर सरकार कोर्टात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवरुन पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

सध्याचे राज्यपाल हे भाजपच्या गोटातून असल्याने नियमांचे काटेकोरपणे पालन करून घेणार याबद्दल शंका नाही. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!