मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.
नुकताच एकनाथ खडसे यांनी अचानक मुंबई दौरा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील मुंबईत असल्याने त्यांची भेट होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भेट न घेताच खडसे मुक्ताईनगरला परतले. अशातच, माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
एका बाजूला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत असताना आता माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या एका वक्तव्याने खडसेंच्या शिवसेना प्रवेशाची देखील चर्चा सुरु झाली आहे. नगरमध्ये बोलताना खोतकर म्हणाले, ‘खड्सेंचे भाजपमध्ये आता त्यांचे राहिले काय आहे? ते जवळपास बाजूला पडले आहेत. फक्त आता इकडे की तिकडे कुठे जायचे? हा मुहूर्त त्यांचा ठरायचा आहे. खडसे हे मोठे नेते आहेत. त्यांना त्यांचे भलेबुरे कळते. त्यामुळे ते योग्य पक्षात जातील, असे मला वाटते. त्यावर खोतकर यांना खडसे शिवसेनेत येतील का? असे विचारले असता ते म्हणाले, ‘हा निर्णय शेवटी त्यांचा आहे. आपण काही म्हणलो तरी निर्णय त्यांना घ्यायचा आहे.’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकनाथ खडसेंच्या पदावरून व आमदारकी वरून चाचपणी देखील झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे. येत्या १७ तारखेला घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे आपल्या राजकीय घटांची देखील नव्याने स्थापना करू शकतात अशा वृत्तांना जोर आला आहे. गेल्या काही महिन्यात खडसे भाजपला राम-राम ठोकणार अशा चर्चा होत होत्या. मात्र खडसेंनी अनेक वेळा हुलकावणी दिली असून आता सर्वांच लक्ष येत्या १७ तारखेकडे लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- भारत आणि चीन सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणार
- विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठीही होणार ठाकरे-कोश्यारी संघर्ष ?
- मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट? राऊत यांच्या ट्वीटने खळबळ
- जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील


