Share

जमत नसेल तर राज्य शासनात परत जा; मुंबईत आयुक्तांविरोधात शिवसेना आक्रमक

Published On: 

मुंबई :आयुक्त इक्बालसिंह चहल उद्धटपणे उत्तरं देत असल्याचा आरोप शिवसेना नेत्यांनी केला आहे. आयुक्तांनी महापौर, सभागृह नेत्या, नगरसेवकांचा मान राखावा, अन्यथा राज्य शासनात परत जावं, असा पवित्रा शिवसेनेनं घेतला आहे.

महापालिकेत सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना आयुक्त इकबालसिंह चहल यांनी उद्धट उत्तरे दिली असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेत नगरसेवकांशी बोलायची पद्धत नसेल तर त्यांनी महापालिकेतून जिथून आले तिथे परत जावं असं शिवसेनेने म्हटलं आहे.

मुंबई महापालिका प्रभाग समिती निवडणुकीस स्वत: कर्मचारीच गैरहजर राहिल्याचे आज पाहायला मिळाले. दरम्यान, प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीस अधिकारी गैरहजर असल्याने महापौर किशोरी पेडणेकर  संतापल्या. या वेळी आयुक्त इकबाल चहल आणि महापौर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, प्रशासकिय अधिकारी उपस्थित का नाही याचा जाब विचारला असता आयुक्त इकबालसिंग चहल यांनी शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना उद्धटपणे उत्तरं दिली. प्रभाग समिती निवडणुकीत प्रशासकिय अधिकारी वेळेवर उपस्थित राहिले नसल्यानं सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनात वाद निर्माण झाला.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!