🕒 1 min read
मुंबई : आज गोव्यामध्ये एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांची बैठक पार पडली. यानंतर एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटायला जात असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत येऊन सर्वप्रथम राज्यपालांना भेटले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक पर पडली . या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाबाबत आणि पदांबाबत चर्चा झाली.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनामा नंतर भाजपच्या देखील हालचाली हालचालींना वेग आला होता. अशातच आता शिंदे गटाकडून देखील त्या अनुषंगाने हालचाली होताना दिसत आहेत. शिंदे यांची राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणारी भेट अजून कोणता राजकीय भूकंप आणणार का हे पाहावे लागणार आहे. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले आहेत. या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राज्यपालांकडे सत्ता स्थापनेबाबत दावा केला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन कोणत्या परिस्थितीत होत आहे हे सर्वांनी पाहिल आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे मित्र पुन्हा येत आहेत अशा प्रकारचा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला. त्याबरोबरच नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याची आपली संस्कृती आणि परंपरा आहे. त्यानुसार शुभेच्छा देतो असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. हे राज्य खूप मोठ आहे हे त्यांना माहित आहे. या राज्यावर संस्कार आहेत. राज्यात सुडाच्या राजकारणाचे पायंडे गेल्या पाच सात वर्षात पाडण्यात आले आहेत. ते आता थांबतील एवढी अपेक्षा आहे. जो कालखंड मिळाला तो महाराष्ट्राच्या हितासाठी लावा, राजकारण, सत्ताकारण थोडं बाजूला ठेवा असा खोचक टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.
भाजपला सत्ता स्थापन करण्यामध्ये कसली अडचण आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी यावेळी विचारला. “त्यांनी एक पक्ष फोडलाय. इतर पक्ष सुद्धा यामुळे चलबिचल आहेत. अस्वस्थता आहे. अशा प्रकारे सत्ता स्थापन करण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. पण राजकारणात या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत, होत असतात. आम्ही त्या करू शकलो नाही म्हणून सत्ता गमावली” असं संजय राऊत यावेळी म्हणाले त्याबरोबरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याची चर्चा असल्याचं त्यांना विचारण्यात आलं. यावर “शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तर पाहू काय होतं ते. पण या क्षणी ते शिवसेनेत नाहीत असं मला वाटतं असं संजय राऊत यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Urmila Matondkar : “तुमच्या नेतृत्वामुळे…”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर उर्मिला मातोंडकरांची प्रतिक्रिया
- Imtiaz Jalil : औरंगाबादचं नाव बदलून मुख्यमंत्र्यांनी घाणेरडे राजकारण केलयं; इम्तियाज जलील यांनी फटकारलं
- Political Crisis : “प्रत्येक लाडूंची किंमत ५० ते १०० कोटी”, कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा
- Bacchu Kadu : लॉजिक की मॅजिक? ठाकरे सरकार कोसळताच ‘त्या’ प्रकरणी बच्चू कडूंना ‘क्लीन चिट’
- Sanjay Raut : नेमकं हेच घडलं! “आपल्याच माणसांनी दिलेले पाठीवरचे घाव…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
