मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरुवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसांत राज्य विकूनच मोकळे होतील, अशी खोचक टीका पडळकरांनी केली आहे.
पडळकरांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले असून अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना ते म्हणाले की,’गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न.’
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही; कारण..’
- त्यांच्यापेक्षा चांगल्या नकला मी करू शकतो; सुधीर मुनगंटीवार संतापले
- ‘मुख्यमंत्री अधिवेशनाला आले नाही, यात काही नवीन घडतंय अस नाही’
- समीर वानखेडेंच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत धक्कादायक माहिती समोर
- सचिन सावंतांनी शेअर केला मोदींचा लोकसभेतील ‘तो’ व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

