Share

‘अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली तर ते चारच दिवसात राज्य विकून मोकळे होतील’

Published On: 

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. नेहमीप्रमाणे यंदाच्याही हिवाळी अधिवेशनाची सुरवात तापलेल्या वातावरणाने झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधक मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक सल्ले देत आहेत. या मुद्द्यावरुन भापने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलां (chandrkant Patil)च्या वक्तव्याने या टीकेला सुरूवात झाली आहे. त्यानंतर प्रसाद लाड (Prasad Lad), गोपीचंद पडळकर(Gopichand Padlkar) अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा सल्ला दिला आहे. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसांत राज्य विकूनच मोकळे होतील, अशी कडवट टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. त्यांनी काही काळ घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्य अधांतरी असल्याचंही बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!