औरंगाबाद : विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Astik Kumar Pandey) यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.२१) हर्सूल टी पॉइंट, बाबा पेट्रोल पंप, सिडको बस स्थानक चौक येथे विना मास्क फिरणाऱ्या ९० वाहन चालकांचे महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी फोटो काढून आरटीओ कार्यालयाला पाठवले आहेत. ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात ही कारवाई सुरूच राहणार आहे.
ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी टास्क फोर्सच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत विनामास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार महानगरपालिका हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीधारकांवर कारवाई करण्यासाठी मनपा आयुक्तांनी आजपासून आदेश दिले आहेत. त्यानुसार मंगळवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो आरटीओ कार्यालयाला पाठवले आहेत. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.
मंगळवारी मनपा प्रशासकांच्या आदेशानुसार हर्सूल टी पॉइंट येथे २५, बाबा पेट्रोल पंप येथे ३० व सिडको बस स्थानक चौक येथे ३५ विना मास्क वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे फोटो काढून आरटीओ कार्यालयाला पाठवण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे कळवण्यात आले आहे. महानगरपालिका कर्मचारी वरील तिन्ही ठिकाणी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ असे संदेश देणारे टी-शर्ट, टोपी व मास्क घालून विना मास्क वाहनचालकांवर नजर ठेवून आहेत. याबाबत माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- “महिला अत्याचारांचा वाढलेला आलेख ‘मविआ’ सरकारला विनाशाकडे घेऊन जाणारा”
- “मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी आज लोकप्रतिनिधींना दाखवणार लघुपट”
- “…त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”, संजय राऊतांचा इशारा
- “महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे”
- कर्नाटकात मराठी भाषिकांवर मर्यादेपलीकडे अन्याय होत आहे-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

