मुंबई : भारताच्या कसोटी संघातील खराब कामगिरीमुळे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग आणखी कठीण झाला आहे. आयपीएल दरम्यान दुखापतीमुळे त्याला पुढील दोन महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना तो दुखापती झाला होता. दुखापतीमुळे हंगामाबाहेर गेल्यानंतर त्याला आता तंदुरूस्त होण्यास ५ ते ६ आठवडे लागणार आहेत.
यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना झालेल्या पायाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्यासाठी त्याला किमान ५ ते ६ आठवडे लागतील असे अजिंक्य रहाणे म्हणाला आहे. कोलकाताच्या आयपीएलमधील १३व्या साखळी सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती. त्यानंतर तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला होता.
रहाणे म्हणाला, ‘ही (दुखापत) घटना माझ्यासाठी खूपच दुर्दैवी होती. माझ्या दुखापतीवर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. मी थोड्या थोड्या प्रमाणात बरा होत आहे. बंगळुरूमध्ये (नॅशनल क्रिकेट अकादमी) सुमारे १० दिवस राहिलो होतो. आता पुन्हा उपचारासाठी आणि दुखापतीतून बरे होण्यासाठी तिथे जात आहे. सध्या माझे सर्व लक्ष लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यावर आहे. मी कधी पूर्णपणे तंदुरुस्त होईल हे मला माहीत नाही. त्यासाठी कदाचित ५ ते ६ आठवडेही लागतील.”
"That injury was really unfortunate. But my rehab is going really well. I am recovering really well. So right now my only focus is on getting better," Ajinkya Rahane Gives Update On Hamstring Injury.#IPL2022 #IPL #IPLFinal #AjinkyaRahane #KKR #kolkataknightriders #Cricket pic.twitter.com/UD1rHn1xNH
— Kheltalk (@Kheltalk_) June 3, 2022
राहणे आणि पुजारा झाले होते संघाबाहेर
श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील कसोटी मालिकेत रहाणे आणि पुजारा यांना खराब कामगिरीमुळे निवड समितीने संघातून वगळले होते. त्यानंतर कौंटी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत पुजाराने संघात पुन्हा पुनरागमन केले आहे. इंग्लंड दौऱ्यात भारताला पूर्वनियोजित केवळ एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे जो मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आला होता. हा सामना १ जुलै ते ५ जुलै दरम्यान खेळायला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

