Share

आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ‘राज्यातील सत्ता ज्या ज्या वेळी काका-पुतण्यांच्या हातात जाते, त्यावेळी धनगर समाजावर जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. मात्र, आता बहुजन समाज जागा झाला आहे. आमच्या मागण्या आम्ही मान्य करून घेऊच. वेळीच जागे व्हा अन्यथा धनगर समाजाने मुंबईला वेढा दिला तर तुम्हाला पळता भुई थोडी होईल’ असा घाणाघात धनगर समाजाचे नेते, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

तर आता धनगर आरक्षणावरून भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारने धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विकास महात्मे यांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली भुमिका जाहीर केली.

खा.महात्मे म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार आरक्षणाच्या चक्रव्युहात अडकलं आहे. मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षण आणि धनगर आरक्षणासाठी सरकारला इशारे देण्यात आले आहेत. धनगर आरक्षणासाठी तर या सरकारने काहीच केलं नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले होते. महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम धनगर समाजाला द्यावी, अशी मागणी करतानाच धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!