बीड : बीडमध्ये उद्या, दि.५ जून रोजी मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यांवर मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढला जाणार आहे. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने याला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, हा मोर्चा कोरोनाच्या संकटामुळे उद्या न काढता पुढे ढकलावा, अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तर यावर आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला धुडकावून लावले आहे. ‘मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा तर निघणारच आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांना आडवून ठेऊ नये. अन्यथा ज्या ठिकाणी पोलीस मराठा समाज बांधवांना अडवतील त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करू’ असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिलाय. यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन आणि आ.मेटे हे आमनेसामने आलेत. दरम्यान, उद्या मोर्चा निघणार की नाही अथवा कशा पद्धतीने निघणार आहे याकडे लक्ष लागले आहे.
अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प हे आश्चर्यकारक
पाटील म्हणाले, फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारला ते टिकवता आले नाही. ९ सप्टेंबरला स्थगिती मिळाली यावेळी चक्क सरकारचे वकीलच गैरहजर होते. सरकारने कधीच हा विषय गांभीर्याने न घेतल्याने हे आरक्षण गेले. शिवाय, समांतर योजना ज्या सुरू केल्या होत्या त्या बंद पडल्या किंवा त्यांना निधीही दिला नाही. विशेष म्हणजे सरकारमध्ये अजित पवारांसारखे मराठा मंत्री असतानाही ते चकार शब्द न काढता गप्प आहेत हे आश्चर्यकारक असल्याची टीका नरेंद्र पाटील यांनी बीडमध्ये केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
- ‘..ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू’, संभाजीराजेंचा इशारा
- ‘आरक्षणावर अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प असणे हे आश्चर्यकारक’
- ‘ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव’
- सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे, गिरीश महाजनांचा हल्लाबोल


