Share

‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून श्रेय घेण्याचा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा उतावीळपणा काल चव्हाट्यावर आला. राज्यातील लॉकडाऊन पाच टप्प्यांत उठवला जाणार असून त्याची शुक्रवारपासूनच अंमलबजावणी केली जाणार असल्याची घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी केली. मात्र, तासाभरातच राज्य सरकारने मुख्य सचिवांमार्फत निवेदन प्रसिद्धीला देऊन निर्बंध हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचा खुलासा केला. त्यापाठोपाठ लॉकडाऊन १५ जूनपर्यंत कायम असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ठणकावून सांगितल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.

विजय वडेट्टीवार यांच्या परस्पर घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. निर्बंध उठवण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री रविवारी जनसंवाद साधून करणार होते. त्यानंतर निर्णयाची दोन दिवसांनी अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाचे नियोजन होते. दरम्यान, राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत निर्बंध शिथिल करण्याच्या ५ टप्प्यांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे ते म्हणावले.

दरम्यान, या घटनांमुळे महाविकास आघाडीमध्ये विसंवाद असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण, काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कसलाही विसंवाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

‘विजय वडेट्टीवार अत्यंत जेष्ठ मंत्री आहेत. राज्यकारभाराचा त्यांना अनुभव आहे. पण, काही विषयांवर संभ्रम आहे. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यास हा संभ्रम दूर होईल. पण, सरकारमध्ये कसलाही विसंवाद नाहीये. सगळ्यांनी एकत्र मिळून काम करावं लागणार आहे, समन्वय वाढवावा लागेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ‘काँग्रेस नेत्यांमध्ये काही विषयांबाबत संभ्रम असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर तो प्रश्न मिटेल. त्यामुळे विसंवादाचा मुद्दा नाही, सरकारमध्ये समन्वय आहे. मुख्यमंत्री लवकरच अनलॉकबाबत घोषणा करतील, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!