बीड : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यावरून काँग्रेसने मेटेंवर टीका केली आहे. ‘बीडचा मोर्चा हा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे. मराठा समाजाचा मोर्चा असता तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो’, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
‘आरक्षणाचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडणाऱ्या खासदार संभाजीराजेंना पंतप्रधान भेट देत नाहीत. विनायक मेटेंच्या कार्यक्रमाला रसद पुरविण्याचे काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण न देता रस्त्यावर उतरण्यास प्रवृत्त करून डोकी भडकवणे, हाच उद्योग फडणवीस करीत आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी बीड येथील पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजप सरकारने अनेक घटना दुरुस्त्या करून राज्याचे अधिकार हिरावून घेतले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय आहे, हे सांगण्याऐवजी चुकीचा अर्थ काढून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम फडणवीस करीत आहेत. समाजमाध्यमांवर बंधने घालून एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करीत आहे.
आरक्षणाच्या बाबत खासदार संभाजीराजे योग्य भूमिका मांडत आहेत. पण, त्यांना पंतप्रधान वेळ देत नाहीत, हे दुर्दैवी आहे. आमदार मेटे जाणीवपूर्वक मराठा समाजाची माथी भडकवत आहेत. त्यांना रसद पुरविण्याचे काम फडणवीस करीत आहेत असा आरोप लाखे पाटील यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने
- ‘सरकारमध्ये विसंवाद नाहीये, पण समन्वय वाढवावा लागेल’, ‘त्या’ गोंधळानंतर थोरातांची प्रतिक्रिया
- ‘..ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू’, संभाजीराजेंचा इशारा
- ‘आरक्षणावर अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प असणे हे आश्चर्यकारक’
- ‘ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
