बीड : महाविकास आघाडीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय कधीच गांभीर्याने घेतला नाही. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण महाविकास आघाडीला टिकवता आले नाही. मंत्री अशोक चव्हाण यांना विविध शिष्टमंडळांनी निवेदन देऊनही त्यांनी यात गंभीरता दाखवली नाही. ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपेक्षाभंग केला आहे. तसेच अण्णासाहेब पाटील यांच्यासह ४२ मराठा तरुणांचे बलीदान व्यर्थ गेले, अशी टीका कै. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी बीडमध्ये केली.
बीडमध्ये ५ जून रोजी मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यांवर मराठा क्रांती संघर्ष मोर्चा काढला जाणार आहे. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने याला पाठिंबा दिला आहे. नरेंद्र पाटीलही आता मोर्चात उतरलेत. अनेक भागात गुरुवारी बैठका घेतल्यानंतर पाटील व आमदार मेटे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली.
अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प हे आश्चर्यकारक
पाटील म्हणाले, फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते. सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारला ते टिकवता आले नाही. ९ सप्टेंबरला स्थगिती मिळाली यावेळी चक्क सरकारचे वकीलच गैरहजर होते. सरकारने कधीच हा विषय गांभीर्याने न घेतल्याने हे आरक्षण गेले. शिवाय, समांतर योजना ज्या सुरू केल्या होत्या त्या बंद पडल्या किंवा त्यांना निधीही दिला नाही. विशेष म्हणजे सरकारमध्ये अजित पवारांसारखे मराठा मंत्री असतानाही ते चकार शब्द न काढता गप्प आहेत हे आश्चर्यकारक असल्याचे ते म्हणाले.
पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवू नये अन्यथा..
यावेळी आमदार मेटे यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, परवानगी नाकारली तरी ५ जून रोजी मोर्चा निघणार आहे. बीडमधून ही ठिणगी पडली असून राज्यभरात यापुढे असेच मोर्चे निघतील. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवू नये अन्यथा मार्चेकरी त्याच ठिकाणी आंदोलन सुरू करतील, असा इशारा त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव’
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे, गिरीश महाजनांचा हल्लाबोल
- हिजाब घातल्याने खिल्ली उडवणाऱ्या युझरला सना खानने दिले सडेतोड उत्तर
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
