🕒 1 min read
कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप नेत्यांनी स्वत:च्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनाही या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यानंतर खासदार नारायण राणे यांनीही संभाजीराजेंवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर संभाजीराजेंनी जोरदार इशारा देणारे ट्वीट केले आहे.
छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 4, 2021
संभाजीराजेंनी ट्वीटमध्ये इशारा दिला की, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.
भाजपचा संभाजीराजेंच्या याच भूमिकेला विरोध आहे. संभाजीराजे हे राज्य सरकारच्या कलाने वागत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे. आमदार नीलेश राणे व चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच या मुद्द्यावरून संभाजीराजेंवर टीका केली होती. नारायण राणे यांनीही गुरुवारी संभाजीराजेंवर खोचक शब्दांत टीका केली. ‘संभाजीराजे छत्रपती यांची खासदारकीची मुदत संपायला आली असल्याने ते जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये फिरत आहेत. मात्र, जनता त्यांच्या बाजूने आहे का?, असा प्रश्न राणे यांनी काल उपस्थित केला होता.
महत्वाच्या बातम्या
- ‘आरक्षणावर अजित पवारांसारखे मराठा मंत्री गप्प असणे हे आश्चर्यकारक’
- ‘ओबीसी समाजाला शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या संपवण्याचा ठाकरे सरकारचा डाव’
- अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये ‘मामा’ म्हणण्याचा आहे एक भन्नाट किस्सा
- सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे, गिरीश महाजनांचा हल्लाबोल
- शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा विकास करण्याचा संकल्प – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
