Share

“असा लुच्चा पंतप्रधान…” ; सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टिकेनंतर दीपाली सय्यद यांचे वादग्रस्त वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना नेते अनिल परब यांच्या सरकारी निवासस्थानी ईडीने काल (गुरुवार) जवळपास १३ ते १४ तास कसून चौकशी केली. यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. सदानंद कदम यांच्या मालकीच्या दापोली तालुक्यातील रिसॉर्टमधील सांडपाणी थेट समुद्रात जात असल्याच्या तक्रारीवरून माझ्या घरांवर आणि माझ्याशी संबंधित माणसांवर कारवाई केली जात आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली. अशातच अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली होती. “असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहीला नाही,” असे सोमय्या म्हणाले होते. यावरुन आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

दिपाली सय्यद यांनी सध्या भाजपमध्ये असलेल्या नेत्यांवर किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाचा दाखला दिला आहे. तसेच “त्या नेत्यांना पाठीशी घालणारा असा लुच्चा पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल,” अशी टीका केली आहे.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या नेत्यांना मोदींनी पक्षात घेतले आहे. आता मोदी कारवाई बद्दल बोलत नाहीत. माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्यावर मधू कोंडाशी संबंधित कंपन्यांशी असलेल्या व्यवहारांवरुन सोमय्यांनी आरोप केले होते. तसेच माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर पॉन्झी स्किमच्या माध्यमातून १० लाख लोकांची फसवणूक केल्याच्या आरोप सोमय्यांनी केला होता.”

किरीट सोमय्या यांनी मंत्री नारायण राणे यांच्यावर ३०० कोटींच्या मनी लॉण्ड्रिंगचा आरोप केला होता. २०१७ मध्ये सोमय्यांनी हा आरोप केला होता, यांना पाठीशी घालणारे असे लुच्चा पंतप्रधान अख्या भारताने पाहिला नसेल, अशी टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे.

काय म्हणाले होते सोमय्या?

“उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यासंबंधी नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवलं असं सांगतात,” असे किरीट सोमय्या म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!