मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये, आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर-२ (RR vs RCB) सामना खेळायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून हा सामना खेळला जाईल. हा सामना जिंकणाऱ्या संघाची अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी गाठ पडेल.
या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आयपीएलकडून आरसीबी संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फटकारण्यात आले आहे. दिनेश कार्तिकला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे. यापाठचे कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही.
Dinesh Karthik has breached IPL code of conduct in the Eliminator of IPL 2022 – he has admitted the offence.
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2022
दिनेश कार्तिकने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये दमदार खेळ केला. या सामन्यात कार्तिकने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध २३ चेंडूत ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यासह रजत पाटीदारसह ४१ चेंडूत ९२ धावांची नाबाद भागीदारी केली. दिनेश कार्तिक याच सामन्यासाठी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

