मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये, गुजरात टायटन्सने सातत्याने चांगली कामगिरी करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या संघाच्या यशावर भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रानेही प्रतिक्रिया दिली आहे. चोप्रा म्हणाला, ”या संघाच्या यशाचे रहस्य वेगवेगळे मॅचविनर्स असण्यात आहे. प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक सदस्य योगदान देत आहे आणि त्यामुळेच विरोधी संघ कधीही निवांत असू शकत नाही.”
क्वालिफायर १ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारा गुजरात टायटन्स हा पहिला संघ ठरला आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात जो विजय मिळवेल त्याचा सामना हार्दिक पंड्याच्या संघाशी होईल.
Player One: Gujarat Titans ✅
Player Two: #AavaDe! pic.twitter.com/8ylJoAHQZ3— Gujarat Titans (@gujarat_titans) May 24, 2022
आकाश चोप्रा म्हणाला, ”गुजरात टायटन्सला इतर संघांपेक्षा वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे वेगवेगळे मॅच विनर्स आहेत. वेगवेगळ्या खेळाडूंनी कठीण परिस्थितीत हात वर करून स्वतःला सिद्ध केले आहे. गुजरात फक्त ३-४ मॅच विनर्सपुरता मर्यादित नाही. अशा संघाला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.”
आयपीएलमध्ये अनेक हंगामांपासून प्लेऑफची पद्धत सुरू आहे. जिथे गुणतालिकेतील अव्वल २ संघांना अंतिम फेरीत जाण्याच्या दोन संधी मिळतात. यावेळी क्वालिफायर १ मध्ये गुजरातकडून पराभूत झाल्यानंतर, राजस्थानकडे आणखी एक संधी आहे. एलिमिनेटर सामना जिंकलेल्या आरसीबीशी त्यांचा सामना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

