मुंबई : क्रिकेटच्या सर्वात लहान म्हणजे टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक आंद्रे रसेल हा आहे. आयपीएल 2022 आंद्रे रसेलने फलंदाजीने आणि गोलंदाजीने दमदार कामगिरी केलेली दिसून आली. कोलकाता संघाला यावेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. पण रसेलचा खेळ यंदाच्या हंगामात दमदार होता. त्याचबरोबर संघासाठी त्याची अष्टपैलू कामगिरी वाखाणण्याजोगी होती. रसेलने आयपीएलच्या १५ व्या हंगामात आपल्या कामगिरीने चर्चेत राहिला होता. आता आयपीएल २०२२ संपल्यानंतर तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
आंद्रे रसेलने स्वतःला मर्सिडीज-बेंझ एएमजी कार विकत घेतली आहे. रसेलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या नवीन कारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘मी नेहमीच मोठी स्वप्ने पाहतो आणि ही स्वप्ने त्याग आणि मेहनतीच्या बळावर साकार होतात.’ आद्रे रसेलने नवीन कार खरेदी केल्यानंतर त्याच्यावर खूप अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ज्यामध्ये त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त ख्रिस गेल, डॅरेन सॅमी आणि सूर्यकुमार यादव सारखे अनेक क्रिकेटपटू देखील दिसत आहेत. रसेल नेहमीच त्याच्या नवीन शैलीसाठी ओळखला जातो. याअगोदर तो त्याच्या हेअर स्टाईल मुळे प्रचंड चर्चेत राहिलेला आहे. सोशल मीडियावरही रसेलला चाहते मोठ्या संख्येने प्रतिसाद देत असतात. रसेल त्याच्या दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्या करिअरमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलमध्ये अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत.
https://www.instagram.com/tv/Cel5viDAmjZ/?igshid=YmMyMTA2M2Y=
आंद्रे रसेलच्या नवीन कारबद्दल बोलायचे झाले तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची किंमत २ कोटी रुपये आहे. या हंगामात आयपीएलमध्ये त्याने कोलकातासाठी १४ सामन्यात ३७.२२ च्या सरासरीने ३३५ धावा केल्या यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १७४.५ होता. तर त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ७० होती. याशिवाय त्याने १४ सामन्यांत १७ बळीही मिळवले होते.
महत्वाच्या बातम्या:


