Share

IPL 2022 LSG vs MI : शतक झळकावलं, मुंबईलाही हरवलं….तरीही केएल राहुलला २४ लाखांचा दंड! वाचा कारण

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्स (LSG vs MI) विरुद्ध दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लखनऊचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) याने नाबाद १०३ धावा करत मोसमातील दुसरे शतक झळकावले. मात्र, विजय मिळवून शतक ठोकूनही राहुलसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. लखनऊने मुंबईला ३६ धावांनी हरवले. मुंबईचा हा सलग आठवा पराभव ठरला, यासह रोहितसेनेचे आव्हान संपुष्टात आले आहे.

या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यासाठी राहुल दोषी आढळला असून त्याला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलशिवाय संघातील इतर खेळाडूंना ६ लाख रुपये किंवा मॅच फीच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलसाठी सर्वात मोठी वाईट बातमी म्हणजे चालू हंगामात तो पुन्हा एकदा या गुन्ह्यात दोषी आढळला तर त्याला ३० लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घातली जाईल.

राहुलने या हंगामात एकूण तीन दंड भरले आहेत. मुंबईविरुद्धच खेळल्या गेलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यासाठी त्याला प्रथमच १२ लाखांचा दंड भरावा लागला होता. त्या सामन्यातही राहुलने नाबाद शतक झळकावले आणि त्याचा संघ विजयी झाला. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध राहुल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळला.

असा रंगला सामना…

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला सलग आठव्या पराभवाला (LSG vs MI) सामोरे जावे लागले आहे. वानखेडे मैदानावर रंगलेल्या स्पर्धेतील ३७व्या सामन्यात लखनऊने मुंबईला ३६ धावांनी मात दिली. यासह मुंबईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कप्तान केएल राहुलने यंदाच्या मोसमातील दुसरे अर्धशतक ठोकले आणि लखनऊने मुंबईला १६९ धावांचे आव्हान दिले. या मोसमातील पहिले शतकल राहुलने मुंबईविरुद्धच केले होते. प्रत्युत्तरात मुंबईचे फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले आणि त्यांना २० षटकात १३२ धावांपर्यंतच पोहोचता आले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!