🕒 1 min read
पुणे : आज पुण्यात माध्यमांशी शरद पवारांनी संवाद साधला. “सत्ता गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात. सगळेच माझ्यासारखे नसतात. निवडणुकांपूर्वीच काही लोकांनी ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’, अशा घोषणा दिल्या होत्या. त्यामुळेच ते सध्या अस्वस्थ होत असतील, तर मी त्यांना दोष देणार नाही”, अशा शब्दांत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती.
सरकारं वारंवार पाडणारे,
काँग्रेसला वारंवार सोडणारे आणि पुन्हा त्याच काँग्रेसला वारंवार साथ देणारे कशामुळे अस्वस्थ होते: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) April 25, 2022
यावर आता देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरकारं वारंवार पाडणारे, काँग्रेसला वारंवार सोडणारे आणि पुन्हा त्याच काँग्रेसला वारंवार साथ देणारे कशामुळे अस्वस्थ होते? असा थेट सवाल करत फडणवीसांनी शरद पवार यांना उत्तर दिले आहे.
माझी सत्ता कित्येकदा गेली –
शरद पवार यांना भाजप नेत्यांची महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीविषयी प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते, सगळेच माझ्यासारखे नसतात. माझी सत्ता कित्येकदा गेली आहे. १९८० साली माझे सरकार बरखास्त झाले. रात्री साडेबारा वाजता मुख्य सचिवांनी मला ही बातमी दिली. त्यानंतर मी तीन-चार लोकांना बोलावून घरातील सामान आवरले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. सरकारची गादी सोडली. त्यादिवशी मुंबईत इंग्लंड आणि भारत यांची क्रिकेट मॅच होती. ती मॅच पाहण्यासाठी मी सकाळी १० वाजता वानखेडे स्टेडिअमवर गेलो आणि दिवसभर मॅच पाहण्याचा आनंद लुटला. सत्ता येते आणि जाते. त्यामुळे आपण इतके अस्वस्थ होण्याची गरज नाही”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
