🕒 1 min read
मुंबई : मातोश्री समोर येऊन आम्ही हनुमान चालीसा पठण करणारच असे, उद्धव ठाकरेंना आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला अटक करण्यात आली. सध्या ते तुरुंगात आहेत. राणा दाम्पत्य यांच्या घरासमोर आंदोलन आणि घोषणाबाजी करणाऱ्या १६ शिवसैनिकांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. या सर्व १६ शिवसैनिकांची आता जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आपल्या सुटकेसाठी राणा दाम्पत्य अजूनही धावाधाव करत आहेत. आपल्या वरील गुन्हे रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना आता जामिनासाठी चार दिवसांची वाट पाहायला लागणार आहे. तोपर्यंत त्यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे. राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले होते. पोलिसांनी विविध मुद्द्यांवर पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर आता राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. राणा दाम्पत्याकडून जामिनासाठी अर्ज केला गेला होता. पण न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.
राणा दाम्पत्याला जामिनासाठी धावाधाव करावी लागत आहे तर अटक झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे, असे सरकारी वकील प्रदीप घरात यांनी सांगितले. यामुळे राणा दाम्पत्याची अडचणी अधिकच वाढलेले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
