🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO या अमेरीका प्रणित लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. मात्र युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्करासमोर दुर्बळ ठरत आहे.
रशियाच्या लष्कराने जरी आक्रमक पवित्रा अवलंबविला असला तरी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनचे लष्कर सुद्धा जमेल तसा प्रतिकार करत आहे. व्होलोडिमिर झेलेन्स्की हे रशियाच्या आक्रमक लष्करासमोर एकटे खिंड लढवत आहेत. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या लढवय्या स्वभावामुळे रशियाचे बलाढ्य लष्कर हव्या त्या वेगाने युक्रेनवर ताबा मिळवू शकत नाहीये.
मात्र आता याच व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याबाबतीत रशियन मीडियाने एक खळबळजनक दावा केला आहे. रशियन मीडियाच्या दाव्यानुसार युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी युक्रेन सोडलं असून ते सध्या पोलंडमध्ये पोहचले आहेत. मध्यंतरी व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी युक्रेन देश सोडला असल्याची बातमी मोठ्या प्रमाणात युरोपात पसरली होती ; मात्र त्या सगळ्या अफवा ठरल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या :
- Russia Ukraine War: गेल्या आठवड्याभरात युक्रेनमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर; ‘धक्कादायक’ आकडेवारी समोर
- ‘ओबीसी आरक्षणात माझा कुठेही रोल येत नाही’; विजय वडेट्टीवारांचे वक्तव्य
- ‘पोलिसांवर भाजप नेत्यांचे दडपण असल्याने विक्की कुकरेजा यांच्यावर कारवाई नाही’ – अनिल नगरारे
- युक्रेनमधून आलेल्या मुलांना मंत्र्यांने द्यायला लावल्या ‘मोदी जिंदाबाद’च्या घोषणा; बहुतेकांनी पाळले मौन
- Russia Ukraine war: ऑपरेशन गंगा अंतर्गत ‘मोठ्या’ प्रमाणात भारतीयांचे मायदेशात आगमन; हा आहे आकडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
