Share

Russia Ukraine war: ऑपरेशन गंगा अंतर्गत ‘मोठ्या’ प्रमाणात भारतीयांचे मायदेशात आगमन; हा आहे आकडा

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO या लष्करी संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. हे युद्ध जरी युरोप खंडात चालू असले तरी या युद्धामुळे जगातील अनेक देशांना  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या युध्दाच्या परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत देश पण याला अपवाद नाही. भारतातून दरवर्षी अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घ्यायला जात असतात. युक्रेनमध्ये असणारे हे विद्यार्थी आणि बाकी नोकरीकरिता गेलेले भारतीय मोठ्या संख्येने युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.

युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गतच भारत सरकारमधील ४ मंत्री सुद्धा युक्रेनच्या शेजारील देशात पोहचले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, हरदीप सिंग पुरी, जनरल वी. के. सिंग आणि किरण रिजिजू हे मंत्री युक्रेन शेजारील देशात भारतीयांना मदत करावयास गेले आहेत.

आत्तापर्यंत एअर इंडियाच्या विमानाने अनेक भारतीय युक्रेनहून मायदेशात परत आलेले आहेत. आजच सुप्रीम कोर्टमध्ये युक्रेनसंबंधी याचिकेवर सुनावणी होताना केंद्र सरकारने माहिती दिली आहे कि, ‘युक्रेनमध्ये अडकलेल्या १७००० हुन अधिक भारतीयांना मायदेशात परत आणण्यास भारत सरकारला यश आले आहे. तसेच ऑपरेशन गंगा अंतर्गतच भारत सरकारमधील चार मंत्री सुद्धा युक्रेन शेजारील देशात गेले आहेत. तर सुप्रीम कोर्टने युक्रेनमध्ये  अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार करत असेलल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ”भारत सरकारने ज्या तत्परतेने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यास पाऊले उचलली आहेत ती अत्यंत प्रशंसनीय असून अजूनही बऱ्याच बाबींवर भारत सरकारने काम करावयास हवे. तसेच भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी एक हेल्प डेस्क सुद्धा सुरु करावा” असेही निर्देश आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारत सरकारला दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!