मुंबई : भाजपाचे आमदार अमीत साटम यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी डेडलाईनच्या काही तास आधी निविदेची अटच बदलली असा गंभीर आरोप केला आहे. “मुंबई महापालिकेत आदित्यसेनेची भ्रष्टाचाराची शृंखला सुरूच आहे. त्यामुळे आम्हीपण आमची पोलखोलची मालिका सुरूच ठेवू व यांचे जनतेच्या हक्काचे पैसे लुबाडणारे काळे धंदे उघडे पाडू, असे बोलत अमीत साटम यांनी गंभीर आरोप केला आहे.
तसेच “इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रीया पार पडत असताना २५ एप्रिल रोजी बिडींगची डेडलाईन संपण्याचा केवळ दीड तास आधी यांनी थेट निविदेची पात्रता अटच बदलून टाकली. एवढ्या घाईगडबडीत कुणाच्या फायद्यासाठी संपूर्ण नियमांची पायमल्ली केली जातेय आणि यात स्पष्टपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वापर होतोय हे दिसतंय. या सर्व प्रकारात प्रशासकीय अधिकारी इक्बालसिंग चहल व आदित्यसेना सामील असल्यामुळे या महाभकास आघाडी सरकारकडनं यांच्यावरती पायबंद घातला जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळेच मी सेंट्रल व्हिजिलन्स कमिश्नरकडे तक्रार दाखल केली आहे व या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी विनंती केली आहे” असं देखील अमीत साटम यांनी म्हटलं आहे.
“मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत केंद्रीय सतर्कता आयोगाच्या (CVC)मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरत मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. निविदा संदर्भ क्रमांक DMM(T-11) /08/73169/A सदरील इलेक्ट्रीक बस खरेदीच्या निविदा प्रक्रीयेत बोलीदारांसाठी २५ एप्रिल २०२२, वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. परंतु याच दिवशी ३ वाजून ३५ मिनिटाला अचानकपणे शुद्धीपत्रक काढण्यात आले आणि यात निविदा भरण्यासाठी बोलीदारांच्या/कंत्राटदारांच्या पात्रता अटीच बदलण्यात आल्या. बदलेल्या पात्रता अटीत विदेशी कंपन्या आणि विदेशातील पात्रता अनुभवही ग्राह्य धरण्यात आला आहे. ही अट अचनाकपणे बदलणे कायदेशीर नाही त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर आहे”. असेही साटम यांनी म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या –


