Share

“एवढाच भोंग्यांचा त्रास होतोय तर स्वत:…”; राष्ट्रवादीचं राज ठाकरेंना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

 पुणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. आता राज ठाकरे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेणार आहेत. या सभेला प्रशासनाने सुरवातीला परवानगी नाकारली होती. यानंतर परवानगी नाकारल्याने मनसे आक्रमक झाली होती. मात्र राजकीय वातावरण पाहिलं असता या सभेला प्रशासनाने परवानगी दिली. या पाश्वर्भूमीवर राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्यावर हलिमा शेख यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

हलिमा शेख म्हणाले, “राज ठाकरे यांना भोंगे, स्पीकर यामुळे त्रास होत असेल तर प्रथम स्वतःच्या सभेतील स्पीकर बंद करून भोंगे, स्पीकरशिवाय सभा करावी. जर पुन्हा कुणाच्या सामाजिक भावना दुखावल्या गेल्या तर याला जबाबदार सभेस परवानगी देणारे पोलीस प्रशासन असेल. तसेच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली असली, तरी अटी व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी. जर सभेत किंवा सभेनंतर अनुचित प्रकार घडला तर याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अल्पसंख्याक विभाग राज्यभर तीव्र मोर्चा काढेल”, असा इशाराच हलीमा शेख यांनी दिला आहे.

 १ मे रोजी राज ठाकरे यांची सभा-

 राज ठाकरे २९, ३० एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, औरंगाबादच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी राज ठाकरे पुण्यातून ३० एप्रिलला रवाना होणार आहेत. राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी १ मे रोजी औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!