औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) औरंगाबादमधील सभेला अटीशर्तींसह परवानगी मिळाली असून सभेसाठी केवळ १५ हजार जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
राज ठाकरे यांच्या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली आहे. वकील अजय कानवडे यांच्यामार्फत कांबळे यांनी सदरील याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज (२९ एप्रिल) सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान दुसरीकडे पोलिसांनी दिलेल्या १६ अटींचं जर राज ठाकरेंनी उल्लंघन केलं, तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील, असा इशारा भीम आर्मीने मनसेला दिला आहे. यामध्ये सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये यासह आणखी काही अटी सभेला लागू राहणार आहेत. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- रुपाली पाटलांची फेसबुकवर बदनामी करणाऱ्या मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल
- “बाळासाहेब थोरातांनी स्वतःच्या अस्तित्वाची…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
- “…हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?”, शालिनी ठाकरे यांचा सवाल
- मुंबईकरांसाठी दानवेंकडून मोठी घोषणा; एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात
- महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

