पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी मनसेच्या १६ पदाधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यासंदर्भात रुपाली पाटील-ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फेसबुकवर ‘एक करोड ताईवर नाराज’ असा ग्रुप तयार करून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अॅड. पुनम काशिनाथ गुंजाळ यांनी तक्रार दिली होती. याविषयी फेसबुक पोस्ट शेअर करत रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की,‘सोशल मिडियावर महिलेला सतत अपशब्द बोलणे,बदनामी करणे,महिलेला टार्गेट करून ट्रोल करणे अश्या बेकायदेशीर कृत्यावर पुण्यातून गुन्हा दाखल करण्यात आला.’ तसेच लवकरच यासंदर्भात सर्व महिला एकत्र येऊन दुसरे पाऊल उचलणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
https://www.facebook.com/Rupalispeak/posts/536422874521124
दरम्यान, दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‘गुंजाळ यांना हा ग्रुप जॉईन होण्यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तसेच त्यांनी या ग्रुपची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांना रुपाली पाटलांचा फोटो दिसला. तसेच या ग्रुपमध्ये रुपाली पाटलांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्यात येत होती. हे बघितल्यानंतर गुंजाळ यांनी महिलेविषयी अश्लील भाषेत बोलू नका अशी विनंती केली. परंतु, त्याचा काहीही फायदा झाला नाही. तद्पश्चात फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र दिनी तिघाडीला ‘हा’ डोस मिळेलच”, आशिष शेलार यांचा इशारा
- महाराष्ट्र सरकार आणि प्रताप सरनाईक यांच्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका
- मुंबईकरांसाठी दानवेंकडून मोठी घोषणा; एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात
- “…हेच काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना का जमत नाही?”, शालिनी ठाकरे यांचा सवाल
- मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही; जालन्यातील ‘या’ गावाचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

