🕒 1 min read
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेला रोजच नवनवीन धक्के बसत आहेत. शिंदे गटाकडून शिवसेना या नावावर आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर देखील हक्क सांगण्यात येत आहे. दोन्ही गटातील हीच लढाई कोर्टात पोहोचली आहे. मात्र ही लढाई शिंदे गटचं जिंकणार अशी शक्यता निर्माण झाली असतानाच आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना कुणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी येण्याची शक्यता असल्याने कोर्टातल्या याचिकांची सुनावणी त्याआधीच घेण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्ट मध्ये केली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाकीत केले आहे.
निवडणूक आयोगाआधी शिवसेनेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सुनावणी करणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केले आहे. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निकाल निवडणूक आयोग देऊ शकतो, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना मिळेल-
रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे नेते, खासदार, आमदार आणि नगरसेवक मोठ्या प्रमाणावर आले आहेत. 2/3 आमदार आणि खासदार शिंदे यांच्याकडे असल्याने शिवसेना पक्षाची मान्यता आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना मिळेल.”
उद्धव ठाकरे गटाने केलेल्या याचिकांवर सुनावणी होण्यास विलंब –
उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्यास विलंब होत आहे. या याचिकांवर ८ ऑगस्टला सुनावणी होणार होती, पण त्यावेळी ही सुनावणी १२ ऑगस्टला घेण्याचे ठरवले गेले. मग १२ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल असे वाटत असतानाच पुन्हा हि सुनावणी लांबणीवर पडली. आता हि सुनावणी २२ ऑगस्टला पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार असून त्याआधीच हि सुनावणी होणार आल्याने ती रमण्णा यांच्याच खंडपीठासमोरच होणार आहे. विशेष म्हणजे या याचिकेच्या सुनावणीदरम्यान रमण्णा यांनी “आम्हाला निर्णय द्यावाच लागेल”, मत देखील नोंदवलं आहे. त्यामुळे या याचिकांवर कोणता निर्णय येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sameer Vankhede vs Nawab Malik | ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल; समीर वानखेडे आक्रमक
- Raosaheb Danve| “…तिथे फोनवर बोलताना ‘वंदे मातरम’ म्हणणं चुकीचं नाही”; दानवेंनीही केले समर्थन
- Santosh Bangar । “…तर मी कायदा हातात घेणारच”; संतोष बांगर यांचे गंभीर विधान
- Shivendra Raje Bhosale | गणेशोत्सवात डॉल्बी सुरू करा ; शिवेंद्रसिंहराजेंची देवेंद्र फडणवीसांना मागणी
- Vinayak Raut । “उदय सामंत टक्केवारी घेऊन कामं करतात,..”; विनायक राऊतांचे खळबळजनक आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
