Share

Sameer Vankhede vs Nawab Malik | ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल; समीर वानखेडे आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या मनी लाँड्रींगप्रकरणी नवाब मलिक हे तुरुगांत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मलिक यांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र नुकतीच जातपडताळणी समितीकडून वानखेडे यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे आता वानखेडे यांनी जास्त आक्रमक भूमिका घेत ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत नवाब मलिकांवर गुन्हा दाखल केला आहे.

मलिक यांनी जात पडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती कि वानखेडे हे मुस्लिम समाजातील आहेत. त्यांनी खोटे कागदपत्र तयार केले आहेत. मात्र या प्रकरणावर वानखेडे यांना क्लीन चिट देत, ते मुस्लीम नसल्याचा निष्कर्ष जातपडताळणीने समितीने काढला आहे. तर आता समीर वानखेडे यांनी मालिकांविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वानखेडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनीही गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा एससी, एसटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा तपास लवकरच सुरु होणार आहे.

वानखेडे हे हिंदूच

समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असल्याचे तक्रारीत म्हटले होते. मात्र पुरावे आणि चौकशीअंती हा आरोप सिद्ध होत नाही. तसेच यासंदर्भात पुरावेही सापडलेले नाहीत, असे समितीने निकालपत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे वानखेडे यांचे ‘हिंदू महार’ हे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निष्कर्ष जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला आहे. तर या निकालानंतर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, असे ट्विट केले होते. त्यामुळेच वानखडे जरी या प्रकरणातून सुटले असले तरी नवाब मलिक मात्र जास्त अडचणीत येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!