मुंबई : बॉलिवूड अभिनेता ‘अजय देवगण’ आणि कन्नड अभिनेता ‘किच्चा सुदीप’ या दोघांमध्ये भाषेचा वाद चालू आहे. यामध्ये अभिनेते आणि राजकरणी व्यक्ती यांच्या प्रवेशामुळे हा विषय चर्चेत बनला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींने देखील या विषयावर टिप्पणी केली. ‘सर्व भारतीय भाषा भारतीयत्वाचा आत्मा आहेत’ असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
जवळपास एक महिन्यानंतर, सँडलवुड स्टार किच्चा सुदीपने आपल्या टिप्पणीवर मौन सोडले आणि मोदींनी केलेल्या टिप्पणी चे कौतुक केले. “मला कोणताही वादविवाद वाढवायचा नव्हता. प्रत्येकाला त्याची भाषा आईसारखी असते याचा अर्थ असा नाही की इतर भाषांचा आपण आदर करत नाही. पीएम मोदींचे हे शब्द ऐकूण आनंद झाला”. अस किच्चा सुदीप कन्नडमध्ये म्हणाला,
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
शुक्रवारी जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आम्ही पाहिले की भाषांवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आपण लोकांना जागरूक करण गरजेच आहे. भाजपला प्रत्येक प्रादेशिक भाषेत भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. आम्ही शैक्षणिक धोरणात देखील प्रादेशिक भाषांना महत्व देतो. यावरून प्रादेशिक भाषेबद्दलची आमची बांधिलकी दिसून येते.
महत्वाच्या बामत्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
