Share

१६ वर्षाच्या भारतीय प्रग्नानंधाचा डंका! जगातील नंबर वन बुद्धिबळपटूचा केला दुसऱ्यांदा पराभव

Published On: 

मुंबई: बुद्धिबळ खेळातील भारतीय ग्रँडमास्टर म्हणून ओळखला जाणारा आर. प्रग्नानंधाने १६ खेळाडूंच्या चेसबल्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जागतिक चॅम्पियन ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. कार्लसनने डावामध्ये त्याच्या ४०व्या चालीवर मोठी चूक केली. या चुकीचा फायदा घेत प्रग्नानंधाने कार्लसनला पराभूत करण्यात यश मिळवले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या एयरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन रॅपिड शतरंज टूर्नामेंटमध्ये कार्लसनला प्रग्नानंधाने पराभूत करत अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवली होती.

चेसबल्स मास्टर्स ही १६ खेळाडूंची ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धा आहे. कार्लसन आणि प्रग्नानंधाचा डाव ड्रॉ कडे जात होती. मात्र कार्लसनने त्याच्या 40व्या चालीवर मोठी चूक केली. प्रग्नानंधाने या चुकीचा फायदा घेत कार्लसनला पराभूत केले. भारताचा युवा ग्रँडमास्टर प्रग्नानंधाने जगातील नंबर वन बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करून इतिहास रचला आहे.

चेसबल्स मास्टर्स स्पर्धेबद्दल सांगायचे झाले तर, या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसानंतर कार्लसन १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर प्रग्नानंधा १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. चीनचा वेई १८ गुणांसह अव्वल, तर डेव्हिड अँटन १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!