Share

Neelam Gorhe | “भाजपच्या आश्रयाला राहून काहींना रोजगारही मिळाला” ; नीलम गोऱ्हे यांची सडकून टीका

Published On: 

🕒 1 min read

बीड : दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी (Shiv Sena) राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका मांडण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याच अनुषंगाने बीड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्याला चांगलाच टोला लगावला आहे. “भाजपने दोन जणांना रोजगार मिळवून दिला. तो म्हणजे किरीट सोमय्या आणि नवनीत राणा यांना”, असं म्हणत गोऱ्हे यांनी थेट किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्यावर टीका केली.

विकासाचे राजकारण तर सोडाच पण पायात खोडा घालण्यासाठीच यांना महत्व दिले जात असल्याचे गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी सांगितले. उट-सूठ शिवसेनेवर टीका करणे हे त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. याबरोबरच शिंदे- फडणवीस सरकारवर देखील नीलम गोऱ्हे यांनी टीकास्त्र सोडले आहे. विकास कामात राजकारण न करता ते काम अविरतपणे सुरू ठेवणे गरजेचे आहे. मात्र असं न करता या सरकारकडून प्रत्येक कामाला स्थगिती दिली जात असल्याचा आरोप निरम गोऱ्हे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय जनतेच्या हिताचे-

महाविकास आघाडी काळात सरकारने घेतलेले निर्णय हे जनतेच्या हिताचे आणि विकासाचे असून केवळ राजकीय स्वार्थासाठी महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती दिली जात असल्याचा आरोप देखील नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेल्या मतभेदांवर विचारण्यात आल्यावर यासंदर्भात बोलणं नीलम गोऱ्हे यांनी टाळलं. पंकजा मुंडे ह्या एक लोकनेत्या आहेत. त्यांचं काम देखील चांगलं आहे, असं नीलम गोऱ्हे यावेळी बोलताना म्हणाल्या.

मिलिंद नार्वेकर भाजपमध्ये जाणार का?-

दरम्यान, “मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) भाजपमध्ये जाणार का?” असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत असताना मिलिंद नार्वेकर हे कुठेच जाणार नाहीत ते शिवसेनेतच राहतील”, असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!