🕒 1 min read
मुंबई : आज मुंबईमध्ये प्रसाद लाड यांनी स्वयंरोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आमचे आशिष शेलार कवी आहेत. बोलता बोलता ते म्हणाले, चाफा बोलेना, चाफा उगवेना. पण असाही एक चाफा आहे जो उगवत नाही, फुलत नाही आणि त्याला वासही येत नाही. असा चाफा फक्त मातोश्रीतच आहे, बाकी कुठे नाही, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. नारायण राणे यांच्या या वक्तव्याला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मनीषा कायंदे म्हणाल्या, “मातोश्रीच्या अंगणामध्ये चाफा फुलेल की नाही याची चिंता तुम्ही करू नका. परंतु तुमच्या अंगणात जे दोन धतुरे उगवलेत त्यांच्यावर तुम्ही लक्ष द्या”. याबाबत एक व्हिडिओ देखईल शिवसेना नेत्या डॉ.मनीषा कायंदे ( Dr. Manisha Kayande ) यांनी आपल्या पोस्ट केला आहे.
अहो नारायण राणे, मातोश्री मध्ये चाफा फुलेल की नाही याची चिंता तुम्ही करू नका, परंतु तुमच्या अंगणामध्ये दोन धतुरे उगवले आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या! pic.twitter.com/PKYZINjXRZ
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) October 1, 2022
दरम्यान, नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरे यांच्या नखाची देखील सर नसल्याचं म्हटलं आहे. “साहेब साहेब होते. साहेबांच्या नखाची सर या माणसाला नाही. बाळासाहेब आग होते. या माणसाला आपण कोळसा देखील म्हणू शकत नाही” अशी घनाघाती टीका राणेंनी ठाकरे यांच्यावर केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips | आत्महत्येचा विचार मनात येत असेल तर ती परिस्थिती कशी हाताळावी, जाणून घ्या!
- Chandrakant Khaire | “मी आता मैदानात उतरलोय, काय होईल…” चंद्रकांत खैरेंचा संदिपान भुमरे यांना इशारा
- Car Update | ‘या’ कार मध्ये आहेत सर्वोत्तम सनरुफ फिचर
- Shahajibapu Patil | “पवारांचे गोडवे गाणाऱ्यांनी शिवतीर्थावर जावं तर बाळासाहेबांचा कडवा…”, शहाजीबापू पाटलांचा इशारा
- Amit Shah | “अमित शहा सत्तेतील प्रभावशाली नेत्यांपैकी एक..” राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
