Share

Chhagan Bhujbal | “भुजबळांना ‘तो’ व्हिडिओ पाठवला, अर्ध्या तासात धमक्यांचा पाऊस…”, ललित टेकचंदानींचे गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी बोलत असताना त्यांनी देवी सरस्वतीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे हिंदू धर्माविरोधात वक्तव्य केल्याबाबत त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरुन भुजबळांनी एका व्यक्तीला धमकी दिल्या प्रकरणी त्यांच्यासह आणखीन दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेंबूर येथील एका रहिवाशाला व्हिडीओ शेअर केल्याबाबत मारण्याची धमकी भुजबळांनी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार देखील संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्यात नोंदवली. ललित टेकचंदानी असं तक्रार करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भुजबळ साहेबांनी हिंदू साधू संत आणि सरस्वती माते विरोधात स्टेटमेंट केले आहे. मी कट्टर हिंदू आहे, मला दुःख झाले. पवित्र नवरात्र सुरू आहे. आमचे उपवास सुरू आहेत. हिंदू देवी देवतांवर बोलणे पंडितांवर बोलणं चुकीचं असल्याचं चंदानी म्हणाले.

शिवीगाळ करत मारण्याची धमकी देली –

एक यूट्यूब चैनल आहे. त्या लोकांनी खूप सुंदर व्हिडिओ केलेत. मला ते आवडले आणि म्हणून मी भुजबळांना फॉरवर्ड केले. तो व्हिडिओ फॉरवर्ड केल्यानंतर अर्ध्या तासात मला एक फोन आला आणि शिवीगाळ करत मला मारण्याची धमकी देखील देण्यात आल्याचं ललित टेकचंदानी यांनी सांगितलं.

दरम्यान, देवी सरस्वतीला कुणी पाहिलं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी कार्यक्रमात केला आहे. तसेच पाहिलं असेल तरी फक्त 3 टक्के लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल, असं देखील भुजबळ म्हणाले होते. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा, अशी मागणी भुजबळांनी केली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!